Saturday 20 October 2018

एसएससी बोर्डांचे विद्यार्थी मुकणार अकरावी प्रवेशाला?

 
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जाणार अशी बातमी वाचनात आली. यावर्षी एसएससी बोर्डाने गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मिळणारे अंतर्गत गुण रद्द केलेत. यास्तव एसएससी  बोर्डातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० मार्कांचा लेखी पेपर लिहावा लागणार अाहे. त्यामुळे यावर्षी एसएससी बोर्डांच्या विद्यार्थ्यांना गुणही कमी मिळणार आहेत. एसएससी बोर्डा व्यतिरिक्त सीबीएससी बोर्ड, आयसीसी बोर्ड, आयबी बोर्ड या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जातात. या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण जवळपास १००  गुणांपैकी ४० पर्यंत गुण दिले जातात. एसएससी बोर्ड आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना वीस अंतर्गत गुण देत होते परंतु या वर्षी ते गुण बंद करण्यात आले आहेत. कारण गुणवत्ता वाढीचे दिले आहे.

याचा परिणाम येत्या शैक्षणिक वर्षामध्ये दिसणार आहे. एसएससी बोर्डांचे विद्यार्थी ज्यावेळी अकरावीची अॅडमिशन घ्यायला जातील त्यावेळी त्यांना प्रवेश मिळणार नाही. इतर बोर्डाचे विद्यार्थी ६० मार्कांचा लेखी पेपर लिहितील व ४० मार्क त्यांना अंतर्गत गुणांमुळे मिळतील. एसएससी  बोर्डाचे विद्यार्थी मात्र शंभर गुणांचा लेखी पेपर लिहितील. त्यामुळे सहाजिकच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. ज्यावेळी अकारावी अॅडमिशनचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी मेट्रोपॉलिटिन शहरांमध्ये (मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक) सर्व टॉपच्या अनुदानित, विनानुदानीत कॉलेजमध्ये एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गूणवत्ता असुनही प्रवेश मिळणार नाही. रुईया, रूपारेल, सेंट झेवियर्स, कीर्ती, एम डी, सौमय्या यासारख्या मुंबईतील नामांकित कॉलेजच्या प्रवेशाचे दार एसएससी बोर्डाच्या मुलांसाठी कायमचे बंद होईल.

हे जाणीवपूर्वक केले जात आहे का?

अनुदानित शाळा, कॉलेजेस सरकारला बंद करायची आहेत का?

अनुदानित शाळा या एसएससी बोर्डाच्या आहेत. एसएससी बोर्डामध्ये राज्यातील एेंशी टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जर एसीसी बोर्डामुळे विद्यार्थ्यांना चांगली कॉलेजेस मिळणार नसतील तर पालक आपल्या पाल्यांना एसएससी बोर्डामध्ये का टाकतील? स्पर्धाही अन्याय करणारी नसावी निकोप असावी. धनदांडग्याच्या इतर बोर्डाच्या शाळा चालविण्यासाठी सरकारने निर्णय घेवु नये. शिक्षणमंत्र्यांनी एसएससी बोर्डाला आपले अंतर्गत गुण पूर्ववत करण्यास सांगावे, नाही तर केंद्र सरकारला सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण बंद करण्याची विनंती करावी. राज्यातील जाणकारांनी, शिक्षणतद्यांनी याबद्दल बोलायला हवे. सरकारने दखल घेवुन एसएससी बोर्डांच्या  विद्यार्थ्याना अंतर्गत गुण द्यावेत. नाहीतर हा फार मोठा एसएससी बोर्डांच्या विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल.

जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


17 comments:

  1. सर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करून ssc , आणि Cbse बोर्डाच्या मुलांना अकरावीला प्रवेश मिळावा अशी मागणी करावी, जर 80 टक्के मुले ssc बोर्ड ची असतील तर सर्व कॉलेज मध्ये 80 जागा या ससा बोर्ड साठी राखीव असाव्यात

    ReplyDelete
  2. सर्व सामान्य जनतेच्या मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या अनुदानित शाळा बंद पाडून धनदांडग्यांच्या शाळा वाढविण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न चालविले जात आहेत. त्याच धोरणांचा हा एक भाग आहे..!

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचं म्हणनं एकदम बरोबरी आहे. पण सरकार म्हणतं आमच धोरण ठरलयं.

      Delete
  3. Vichaar na karta kelela ha nirnay...hya varshi mulance faar nuksaan karnaar aahe..internal marks bandh karun science syllabus ani nako tey history poltical science syllabus cha samvesh karun mulanvar atyachaar kela aahe..eki kade rte mhantey muley aatma hatya karu naye..pan hya varshi dahavit jhalela badal ha nakki vidyharthyanna...deoression madhye gheun jaat aahe..tari boardane twarit..nirnay geun..science syllabus kami karun intdrnal marks cha sahbhaag kelach pahije...nahitar education deprtmnt nakaami aslyache siddh hoil..ek trast paalak...vvidhyarthyaci kevilvani sthiti pahun post karat aahe

    ReplyDelete
  4. खूप चांगला मुद्दा घेतला आहे सर.

    ReplyDelete
  5. Ssc board साठी कोटा वेगळा ठेवावा.खरतर सर्व बोर्ड ना एकच नियम करायला हवा.

    ReplyDelete
  6. हा एसएससी परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांवर अन्याय आहे

    ReplyDelete
  7. अकरावीला प्रवेश घेताना कोटा ठरवणं हा एकच उपाय आहे कारण ssc बोर्ड व इतर बोर्डस ह्यांच्यात समानता आणने
    कठीण आहे (अंतर्गत गुण, गुणदान ,प्रश्नपत्रिकेची कठिण्यता )

    ReplyDelete
  8. ठरले आहे तर चला सामोरे जाऊ या सर

    ReplyDelete
  9. You are right, sarode Sir
    Educationists people should be raise a n voice against this policy of education department .

    ReplyDelete
  10. CBSE बोर्डने त्यांची स्वतःची कॉलेजेस काढावीत आणि आपल्या मुलांना प्रवेश द्यावा आमच्या SSC बोर्डच्या कॉलेजेस मध्ये येऊ नये

    ReplyDelete
  11. One country ....one board kele tar

    ReplyDelete
  12. नमस्कार सर मुद्दा चांगला आहे आदरणीय शिक्षणमंत्री यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना न्याय देतीलच अशी अपेक्षा करुया व आपले आभार विद्यार्थी हिताचे योग्य मुद्दा उपस्थित केल्या बद्दल धन्यवाद..

    ReplyDelete
  13. खूप छान व अतिशय योग्य !
    समाजशास्त्र विषयाचे पण 20 गुण पाहिजेत सर��

    ReplyDelete
  14. आपण अशा धोरणांना विरोध केला नाही त्याचा परिणाम आपले खूप मेहनत घेणाऱ्या ssc बोर्ड च्या मुलावर नक्कीच झाला आहे .यावर निर्णय घ्यायलाच़ हवा

    ReplyDelete
  15. NoVCasino Casino - NOVCASINO.COM
    NoVCasino.com offers septcasino a kadangpintar no deposit bonus of 100% up to €150. No Deposit Bonus is given novcasino to 출장마사지 new players only. goyangfc.com No deposit bonuses expire

    ReplyDelete