Tuesday 30 October 2018

कला क्रीडा शिक्षक शाळेतून हद्दपार?


परवा सचिन तेंडूलकर राज्यपालांना जाऊन भेटला, प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत किमान एक तास खेळाचा असावा, अशी मागणी त्याने केली. भारतात जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवायचे असतील तर त्याची सुरुवात शाळेपासूनच होणे गरजेचे आहे. असे ही त्यांचे म्हणणे होते.      
                                                                                   
शालेय जीवनात कला, क्रीडा व कार्यानुभव विषयाची एवढी मोठी गरज असताना राज्य सरकारने मात्र उलटी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक संचमान्यतेतून कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना वगळले आहे. प्रश्न कला, क्रीडा शिक्षकांच्या नोकरीचा नाही. ज्या विषयाची आवड विद्यार्थ्यांना आहे, ज्या विषयाची गरज विद्यार्थ्यांना आहे, तेच विषय वगळले तर सुदृढ आणि सक्षम पिढी निर्माण कशी होणार? शाळा चार भिंतींचे कोंडवाडे नाही होणार का? अशा कोंडवाड्यात शिक्षण कसे होणार? केवळ शिक्षणावरचा खर्च कमी करण्यासाठी मुलांचे भविष्यच सरकार अंधारात लोटत आहे. काही मुला- मुलींसाठी तर शाळेचे क्रीडांगण ही एकमेव हक्काची खेळण्याची जागा आहे. मुलींना मैदानात जाऊन खेळू दिले जात नाही.
                                                                       
शालेय शिक्षण हे विद्यार्थ्याला जगायचे कसे शिकवते परंतु कला ही कशासाठी जगायचे हे शिकवते. शाळेत प्रवेश करताच शाळेचे रुप बदलले दिसते ते केवळ कला शिक्षकामुळे.  कला शिक्षकांचा केवळ चित्रकारच नाहीतर अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स घडविण्यात फार मोठा वाटा असतो. कला शिक्षकांमुळे शाळा जिवंत वाटते. संगीत, कला, कार्यानुभव हे विषय शाळेचे प्राण आहेत. परंतु याही शिक्षकांना शासनाने आता संचमान्यतेद्वारे  बाहेर काढलेले आहे. जवळपास तीस टक्के पदे रद्द केली आहेत. रिक्त पदे जवळपास ५० हजार आहेत.  
                                                                      
शाळेची शिस्त म्हणजे क्रीडाशिक्षक! 
करडया तरीही स्नेहपूर्ण वातावरणात विविध खेळांचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षक देत असतो. किमान २५० विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक असायलाच हवा असा शासनाचा जीआर सांगतो. शाळा तिथे कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक असणे गरजेचे आहे. आरटीई कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेत शासनाने या शिक्षकांना शाळेतुन हद्दपार केले आहे. ५००० रुपये मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमण्याची अतिथि निदेशक नेमले. १०० विद्यार्थ्यांमागे अर्धवेळ शिक्षक यांचा अर्थ. २०० विद्यार्थ्यांमागे एक पूर्णवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक शाळेला द्यायला हवा होता. ते कायद्याने बंधनकारक असताना त्या सर्व शिक्षकांना अर्धवेळ करून त्यांना पाच हजार रुपये नाममात्र मानधनावर शाळेमध्ये तात्पूर्ती नियुक्ती देण्यात आली. तीन वर्षांनंतर त्यांनाही शाळेतून काढून टाका असेही सांगण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आहे. सचिन तेंडुलकर जसा खेळासाठी पुढे आला तसे राज्यातील सर्व खेळाडू्ंनी व कलाकारांनी पुढे यायला हवे. शासनाला विनंती करायला हवी की शाळेसाठी कला, क्रीडा, कार्यानुभव विषयाची गरज आहे. कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या शिक्षकांना संच मान्यतेत घेण्यात  यावे. त्यांची भरती करावी, त्यांना विशेष शिक्षकांचा दर्जा बहाल करण्यात यावा. अतिथी निदेशकांना पूर्णवेळ करून त्यांना शिक्षकांचे वेतन सुरू करावे. या लढाईसाठी आता कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागेल . मोठा लढा द्यावा लागेल, संघर्षातून विजय हमखास येऊ शकतो. भावी पिढी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एक होणे गरजेचे  आहे. मला खात्री आहे, राज्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक व इतर सर्व शिक्षकांनी या लढयात सामील व्हावे. सर्व संघटनाही या लढ्यात सामील होतील. २४ ऑक्टोबर 2018  रोजी शिक्षक भारतीच्या कार्यालयात राज्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची मिटिंग झाली.  भविष्यातील लढयासाठी एल्गार फुंकण्यांत अाला. आमदार कपिल पाटील येत्या अधिवेशनामध्ये कला, क्रीडा कार्यांनुभव शिक्षकांचे प्रश्न सभागृहात उचलणार आहेत .परंतु रस्त्यावरची लढाई आपणालाच लढायला हवी आणि मला खात्री आहे आपणही सर्वजण या लढाईत सामील व्हाल!! 
लढेंगे! जितेंगे!! 
                                                                             
जालिंदर देवराम सरोदे                                                       
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती.


52 comments:

  1. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे खेळाचे मैदान.

    ReplyDelete
  2. सर ही मागणी खरच खूप महत्वाचे आहे यामुळे विद्ययार्थ्याचा विकास होऊन कला क्रीडा कार्यनुभव निदेशकांचा पण प्रश्न सुटणार आहे धन्यवाद

    ReplyDelete
  3. आपण खूप छान पद्धतीने हा विषय हाताळला आहे सर्व कला क्रिडा व कार्यानुभव शिक्षकांना या माध्यमातून न्याय मिळावा व मुल्याधिष्टित कालसुसंगत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेऊन आपण सर्व या पुढे कला प्रेमी म्हणून पुढे वाटचाल करू आपले खूप खूप आभार
    राधेशाम मिसाळ
    औरंगाबाद

    ReplyDelete
  4. सर्व प्रधम राजकीण्यांना 5000 मानधन देऊन,यांच्या मान्यता रद्द करायला हवेत त्यासाठी रक्तरंजित क्राती करावी लागेल.लोकांना रस्तावर ऊतरावे लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांना मानधन कशाला हवे
      कर्मचाऱ्यांचे पेंशन बंद करून स्वतः भरपूर पेंशन घेतायत
      त्यांचे सगळेच भत्ते आणि सुविधा बंद करायला हव्यात

      Delete
  5. अगदी बरोबरहवाच.कला.क्रीडा शिक्षक प्रत्येक शाळेत हक्र.लढेंगे..जितेंगे.आम्ही आपल्या सोबत आहोत.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  6. कला आणि क्रीडा
    याशिवाय शिक्षणच नव्हे तर जीवन व्यर्थ आहे..

    ReplyDelete
  7. मला समजत नाही शासन असा का? निर्णयघेते शा.शि. शिक्षक प्रत्येक शाळेत आवश्यक आहे जसेअॅकडयामिक करिअर तसेच खेळ ड्राॅईग संगीत कार्यानूभव शेती विषय व इतर विषयाची गरजआहे सर्वागिंन विकास झाला पाहिजे शारीरीक मानसिक बौधिक

    ReplyDelete
    Replies
    1. पैसा बचाव मोहीम

      Delete
  8. साहेब आपण फार छान विश्लेषण केले आहे ह्या प्रकरण्याचे एकी कडे क्रिडा साहित्या साठी कोटी रुपये खर्च करतता खेलो इंडिया खेळा साठी कोटी रुपये खर्च करतात हे शासन पण या सर्व बाबी साठी जो क्रिडा शिक्षक पाहिजे त्याला द्यायाला यांचा जवळ पगार नाही कमी पटसंख्येच्या शाळेवर माझ्यासारखे हजारो आतिथी निदेशक विना वेतन खेळ व आरोग्य हा विषय जिल्हा परिषद शाळेत गोरगरिब मुलांना शिकवत आहे ते पण विना मानधन साहेब तुम्ही हा विषय उचलुन घरून आम्हाला न्याय मिळून घ्यावा ही विनंती

    ReplyDelete
  9. खरोखंंरच सर हा प्रशन मार्गी लागलाच पाहिजे आम्हि तुमच्या सोबत आहो

    ReplyDelete
  10. कले विना जिवन व्यर्थ आहे सर

    ReplyDelete
  11. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन आहे.एक तरी अंगी असु दे कला. नाही तर जन्म फुका जाहला.

    ReplyDelete
  12. आंदोलन करणार

    ReplyDelete
  13. अभ्यासपूर्ण लेख.
    गरज आहे ती शासनाच्या संवेदनशीलतेची.

    ReplyDelete
  14. तीव्र आंदोलन गरजेचे आहे

    ReplyDelete
  15. खरी,परिस्थिती आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, चित्रकार,कलाकार पाहिजेत.परंतु विद्यार्थ्यांचे जडण-घडणीचे वय हे,शालेय वयच योग्यच असते.म्हणून प्रत्येक शाळेत कला,क्रीडा,कार्यानुभव शिक्षक पदे भरलेच पाहिजे.त्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. मला वाटते शासनाचा हा निर्णय म्हणजे !विनाशकाले विपरीत बुद्धि !!शारीरिक सशक्ततता ही खेळातून मिळते !!कल्पकतेला वाव चित्रकलेतुन मिळेते !!मनाची स्थिरता एकाग्रता व मनोरंजन !!अशी ह्या विषयाची शक्ति आणि हेच विषय शासनशाळेतुन हद्पार करणार हे कितपत योग्य आहे शासनानेच ठरवायचे आहे

    ReplyDelete
  18. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा पैलू म्हणजे क्रीडा,कला व कार्यानूभव होय.हिरा हा पैलूशिवाय चमकणार नाही तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकासाची चालना मिळणार नाही.याविषयापासून वंचित करणे म्हणजे यापूढील यूवापिढी बरबाद करण्याचे जाणिवपूर्वक पाप या सरकारच्या हस्ते होईल करीता शासनाला सदबुध्दी देवो ही प्रार्थना....आपला शिक्षकबंधू-डि.आर.सोनटक्के(विभागीय उपाध्यक्ष) महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षकसंघ नागपूर विभाग...

    ReplyDelete
  19. लेख चागला आहे.पण आज येणारे प्रत्येक सरकार आणी
    त्याची शिक्षणव्यवस्तेबाबतची धोरणे विचार करण्यासारखी आहेत.माझ्या मते ज्या देशात शिक्षणाला महत्व दिले जाते मग ते कला,क्रीडा किव्हा इतर शिक्षण असो त्या देशाची भावी पीढी मजबुत असते.

    ReplyDelete
  20. लेख चागला आहे.पण आज येणारे प्रत्येक सरकार आणी
    त्याची शिक्षणव्यवस्तेबाबतची धोरणे विचार करण्यासारखी आहेत.माझ्या मते ज्या देशात शिक्षणाला महत्व दिले जाते मग ते कला,क्रीडा किव्हा इतर शिक्षण असो त्या देशाची भावी पीढी मजबुत असते.

    ReplyDelete
  21. सर आपल मात बरोबर आहे
    आम्ही आपल्या पाठीशी आहोत

    ReplyDelete
  22. शाळेत या शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  23. कला व क्रीडा शिक्षकाची शाळेत गरजच आहे

    ReplyDelete
  24. 1*कला शिक्षक पाहिजे असतील तर शाळा इयत्ता 1ली ते 10वी व 1ली ते 12वी करणे आवश्यक आहे.
    2*क्रिडा शिक्षक नव्हे तर शारीरिक शिक्षण शिक्षक आवश्यक आहे. खेळा साठी शरीराला वळण लावणे आवश्यक असते यासाठी कसरत व्यायाम करावा लागतो व आरोग्य चांगले असणे आवश्यक असते तेव्हा सर्व शैक्षणिक संस्था मध्ये व्यायाम व आरोग्य याचे शिक्षण देणे आवश्यक आहे शैक्षणिक संस्थेमध्ये खेळाचे शिक्षण देणे अव्यवहार्य आहे कारण प्रत्येक शैक्षणिक संस्थेत प्रत्येक प्रमुख खेळाचे शिक्षण देणे अवघड आहे खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत.
    तेव्हा शारीरिक शिक्षण व आरोग्य याचे शिक्षण देण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तसेच उपरोक्त पणे शाळा इयत्ता पहिली ते दहावी आणि इयत्ता पहिली ते बारावी असणे आवश्यक आहे.
    3*कार्यानुभव:या विषयाचे स्वतंत्र शिक्षण देणे अव्यवहार्य आहे कारण एवढे सर्व विषयाचे साहित्य व कुशल शिक्षक उपलब्ध करणे अशक्य आहे तसेच इतर विषयाचे अध्ययन करते वेळी कार्याचा अनुभव येतोच त्याच वेळी विद्यार्थ्यांना योग्य जाणीव देणे आवश्यक आहे तेव्हा स्वतंत्र कार्यानुभव विषय ठेवून अभ्यासक्रम पुस्तिकेची पाने वाढण्यापलीकडे काही साध्य होत नाही त्यामुळे कार्यानुभव विषय काढून टाकणे आवश्यक आहे.
    यांच्या तासिका कला या विषयाला देण्यात याव्यात तसेच कला विषयात संगीत,नृत्य व अभिनय याचा समावेश करण्यात यावा
    कला विषयात चित्रकला,संगीत(गायन व वादन)आणि नृत्य व अभिनय असे तीन विषय करावेत.
    योग्य पध्दतीने विश्लेषण करून मागणी केली पाहिजे.
    सहस्रबुद्धे दिलीप वसंत.

    ReplyDelete
  25. डोळे उघडणारा लेख आपण लिहला
    कला व क्रीडा शिक्षकांची भविष्यात खूपच भयावह स्थिती
    निर्माण होणार आहे

    ReplyDelete
  26. डोळे उघडणारा लेख आपण लिहला
    कला व क्रीडा शिक्षकांची भविष्यात खूपच भयावह स्थिती
    निर्माण होणार आहे

    ReplyDelete
  27. कला क्रीड़ा शिक्षका साथी महत्वाचा विषय।
    ग्रेट सरजी।।।।

    ReplyDelete
  28. सर आपलं मत एकदम बरोबर आहे....
    कला,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकाची गरज आहे म्हनुनच जि.प.शाळेवर नेमणुक झाली....अंशकालीन म्हनुन नेमलं,आता अतिथी म्हनुन नेमलं ...आपली जि.प.शाळेवर गरज आहे म्हनुनचना .....शासनाला फक्त काम करुन घ्यावे वाटते.....जेव्हा पेमेन्टची वेळ येते.तेव्हा शासन अस काहीतरी डावपेज खेळतं

    ReplyDelete
  29. It need of hours if you want to built a strong nation physically and mentally then without any more diley it should be implemented

    Mishra sir nagpur

    ReplyDelete
  30. हे शडयंत्र मूलनिवासी लोकांचे होऊच शकत नाही....भटांची ही एक चाल आहे सर...भट भगाओ देश बचाओ

    ReplyDelete
  31. सरकारच डोकं ठिकाण्यावर आहे का महत्वाचे विषय कडून टाकत आहेत

    ReplyDelete
  32. सरकारच डोकं ठिकाण्यावर आहे का महत्वाचे विषय कडून टाकत आहेत

    ReplyDelete
  33. अतीशय सुंदर लेख.याची.सर.सर्व बाजूने चळवळ उभी राहिली पाहीजे

    ReplyDelete
  34. मोठ दुःख म्हणजे कलाशिक्षक, क्रिडा शिक्षक यांना शाळेची संच मान्यता मधून काढून टाकले . का करत असतील
    असं हे सरकार .. मुलांच भविष्य अंधारात दिसतय

    ReplyDelete
  35. कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे आणि हाच पर्याय आहे जीवन यात्रा संपवण्याची.....

    ReplyDelete
  36. खरं पाहता क्रीडा शिक्षक शाळेचा कणा आहे.

    ReplyDelete