Wednesday 1 November 2017

मुंबै बँक vs शिक्षक भारती


मुंबईतल्या सगळ्या लढाऊ शिक्षकांना सप्रेम नमस्कार,
दिवाळीची सुट्टी संपवून आपण गावावरून किंवा फॅमिली पिकनिक करून आला आहात. मानसिक ताण थोडा कमी झाला आहे. नव्या उमेदीने पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी लढण्याची ऊर्जा घेऊन आला आहात. नव्या जोमाने आपण आपला संघर्ष जारी ठेवूया..

बँकेचं काय झालं? असा प्रश्न तुम्हा सर्वांचा मनात आहे. शासन लबाडी करत आहे. पण तुम्हा सर्वांच्या साथीने आपला संघर्ष जारी आहे...

आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत मुंबै बँकेच्या भ्रष्टाचाराचे जे वाभाडे काढले आहेत ते आता लोकसत्ता सारख्या मोठ्या वृत्तपत्रातून पहिल्यांदाच समोर आलं आहे. त्यामुळे आपण जे म्हणत होते ते पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. ही बँक कशी भ्रष्टाचारी आहे याची सर्व माहितीही आपण यापूर्वीच कोर्टात सादर केलेली आहे, तरीही दडपशाही सुरू आहे. 


------------

आज दि. १ नोव्हेंबर रोजी आपले वकील सचिन पुंडे यांनी मुंबई हायकोर्टात आपली केस मेंशन केली आहे. सुनावणी सोमवारी दि. 6 नोव्हेंबर रोजी असेल. 

दुसरा मुद्दा म्हणजे डिपार्टमेंटने कालच आपले पगार ECS केले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेला तातडीने पगार द्यावेच लागतील.

तरी देखील काहींना पगार उशिरा मिळाले तर कृपया शिक्षक भारतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधा. 
लढेंगे, जितेंगे!

आपले,
जालिंदर सरोदे
8652078080

लीना कुलकर्णी
9820939910

9 comments:

  1. जुन्या पेन्शन योजनेचे काय झाले त्या केस ची पुढची तारीख काय आहे शिक्षक भारती कडून केस टाकली आहे

    ReplyDelete
  2. Can someone also take up the issue of non-teaching staff appointment and also the promotion to the Maharashtra Government will be highly appreciated

    ReplyDelete
  3. Can someone also take up the issue of non-teaching staff appointment and also the promotion to the Maharashtra Government will be highly appreciated

    ReplyDelete
  4. Can someone also take up the issue of non-teaching staff appointment and also the promotion to the Maharashtra Government will be highly appreciated

    ReplyDelete
  5. We are obusley with our MLA shri Kapil patil no dout , we fight & win

    ReplyDelete
  6. सर आम्ही आंदोलनासाठी तयार आहोत.
    आपला हक्क आपण सोडणार नाही.

    ReplyDelete
  7. सर आम्ही आंदोलनासाठी तयार आहोत.
    आपला हक्क आपण सोडणार नाही.

    ReplyDelete
  8. We are always with you go ahead

    ReplyDelete
  9. रात्र शाळांचे काय ?

    ReplyDelete