Friday 19 July 2019

एमईपीएस अ‍ॅक्टमधील प्रस्तावित बदल आणि शिक्षण क्षेत्रात उडालेला गोंधळ


एमईपीएस अ‍ॅक्ट मधील अनुसुची 'क ' मध्ये उच्च प्राथमिक शिक्षकांपासून ते उच्च माध्यमिक शिक्षक - शिक्षकेतरांच्या वेतनश्रेण्या नमूद केलेल्या आहेत. कोणत्या शिक्षकाला कोणती वेतनश्रेणी  मिळावी हे 'क' अनुसुचीमध्ये लिहलेले आहे. कायद्याने तो पगार देणे सरकारला बंधनकारक आहे. सरकारने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, 2019 ((नियम 7 पोट-नियम (i)(ii) ऐवजी )चा मसुदा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेला आहे. 

या मसुद्यानुसार अनुसुची 'क' म्हणजे कायद्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार येथून पुढे राज्य सरकार जो ठरवेल तोच पगार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. एमईपीएस  अ‍ॅक्टमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ही ठरवुन दिलेली असल्यामुळे त्याधर्तीवरचा पगार देणे राज्य सरकारला बंधनकारक होते. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेला वेतन आयोग किंवा महागाई भत्ता असेल तो सरकारला उशिरा का होईना देणे कायद्याने बंधनकारक होते. म्हणुन राज्यातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग किंवा  महागाई भत्ता मिळत होता. 

आता राज्य सरकारने प्रस्तावित केलेला मसुदा जर बदल न होता लागू झाला, तर राज्य सरकार जे ठरवेल त्याचप्रकारचे वेतन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणार आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते कायद्यामध्ये जुनी वेतन श्रेणी नमूद केलेली असल्यामुळे विनाअनुदानित संस्था शिक्षकांना पूर्ण पगार देत नाही. कोर्टामध्ये केस दाखल झाल्यावर आम्ही कायद्यानुसार पगार देताे असे म्हटले जाते. कायद्यात नमुद केलेली वेतन श्रेणी ही जूनी आहे. त्यामुळे सरकारने हा बदल केला आहे असे सांगत आहे. 

विनानुदानित शिक्षकांचे नाव पुढे करुन सरकार अनुदानीत शाळेतील शिक्षक - शिक्षकेतरांचा पगार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. अनुदानित शाळेतील शिक्षकांना मिळणारे वेतनाचे सर्व लाभ विनानुदानित शाळेतील शिक्षकांना मिळतील अशी तरतुद कायद्यात करायला हवी. परंतु त्यासाठी शिक्षकांच्या पगारावरील गंडांतर खपवून घेतले जाणार नाही. याचा जोरदार विरोध शिक्षक भारती व आमदार कपिल पाटील करणार आहेत. सरकारने यासंदर्भातील खुलासा तात्काळ करावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे. 

नवीन शिक्षणमंत्री संवेदनशील आहेत. ते या प्रस्तावित बदलाचा खुलासा लवकरच करतील ही अपेक्षा बाळगूया. ४ ऑगस्टपर्यंत आपण सर्वांनी आपल्या हरकती शिक्षण विभागाला पाठवून या प्रस्तावित बदलाचा विरोध करावा लागेल. सरकारने हा बदल रद्द केला नाही तर अनुदानीत व सरकारी शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी आंदोलनासाठी तयार राहावे. 

आंदोलनाची सुरवात म्हणून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्यांचं पत्र  मा. अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  यांना  पाठवणार आहोत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विरोधाचं नमुना पत्र सोबत जोडलं आहे. यावर पदाधिकारी यांनी शाळांमधून सह्या गोळा करून सदर निवेदनाची एक प्रत मा. अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई - ४०००३२ यांना पाठवावे व दुसरी प्रत shikshakbharatimumbai@gmail.com यावर ईमेल करावी अथवा शिक्षक भारतीच्या मुख्य कार्यालयात जमा करावी.


( निवेदनाचा नमूना )

लढा अपरिहार्यच !                                         
लढेंगे-जितेंगे !                             

जालिंदर देवराम सरोदे                  
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य

68 comments:

  1. खूपच छान सर
    लढल्याशिवाय गत्यंतर नाही....

    ReplyDelete
  2. हा कट आहे. गरिबांची मुले पुढे जाऊ न देण्यासाठी

    ReplyDelete
  3. अन्याया विरोधात लढा दिलाच पाहिजे

    ReplyDelete
  4. हे जर खरं असेल तर ही बाब खूपच भयानक आहे हा आपल्यावर अन्याय आहे

    ReplyDelete
  5. संघर्ष करावाच लागेल

    ReplyDelete
  6. संघर्ष करू आणि सरकारचा डाव उधळून लावू

    ReplyDelete
  7. आपल्या हक्कांसाठी लढू या जिंकू या..जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  8. मा.शरद पवार वेडे होते काय?
    शिक्षकांच्या बाबतीतच ह्या सरकारला एवढा आकस का?
    यांचं शिक्षकांनी काय घोडं मारलं आहे ?
    इतर देशांमध्ये शिक्षकांना किती मानसन्मान आहे,त्या देशांचं अनुकरण हे सरकार करायला का धजावत नाही ?
    शिक्षकांनीच यांना बाराखडी शिकवली त्यांचेच हे बारा वाजवायला निघालेत ?
    ज्या देशात शिक्षकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही,त्यांना गुरूचे स्थान दिले जात नाही,पदोपदी त्यांच्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्याची अवहेलना करून अपमानित ककेले जाते,शिक्षकांना त्याच्यावर होणार्या अन्याया विरोधात व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागते अशा ह्या शिक्षकद्रोही सरकारचा फक्त निषेध करून चालणार नाही तर सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी स्वतःचं अस्तित्व टिकविण्याठी एकजूटीने सरकारच्या ह्या जुलमी मसुद्याला टोकाचा विरोध केलाच पाहिजे.
    जे शिक्षक भारतीचे शिक्षक आमदार मा.कपिल पाटील साहेब आणि त्यांचे धुरंधर पदाधिकारी सतत शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने लढा देत आहेत त्यांची साथ देऊन त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत व या शिक्षकद्रोही सरकारला धडा शिकवला पाहिजे.

    ReplyDelete
  9. ह्या बिजेपि सरकारला फक्त कपाती साठी शिक्षकच का दिसतो. बाकी कर्मचारी / खाते का दिसत नाहित? पहान 2005 आगोदरच्या व नंतर100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांची पेन्शन पण बंद ? ह्या सरकारला जागा दाखवायला हविच. यासाठी आपले संघटन व त्याला भक्कम नेत्रत्व हवेच आहे. सर आंम्ही सर्वजन आपल्या सोबत आहोत. आपण फक्त आदेश दया.

    ReplyDelete
  10. या विरोधात लढायला हवं प्रखर लढा हुबारू आपण

    ReplyDelete
  11. शासनास शिक्षण मोडीत काढून खाजगीकरण करण्याचा डाव आहे . याचा नक्कीच निषेध .

    ReplyDelete
  12. सर्व संघटनांनी या मुद्दावर एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे
    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत .

    ReplyDelete
  13. 50
    मा.शरद पवार वेडे होते काय?
    शिक्षकांच्या बाबतीतच ह्या सरकारला एवढा आकस का?
    यांचं शिक्षकांनी काय घोडं मारलं आहे ?
    इतर देशांमध्ये शिक्षकांना किती मानसन्मान आहे,त्या देशांचं अनुकरण हे सरकार करायला का धजावत नाही ?
    शिक्षकांनीच यांना बाराखडी शिकवली त्यांचेच हे बारा वाजवायला निघालेत ?
    ज्या देशात शिक्षकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही,त्यांना गुरूचे स्थान दिले जात नाही,पदोपदी त्यांच्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्याची अवहेलना करून अपमानित ककेले जाते,शिक्षकांना त्याच्यावर होणार्या अन्याया विरोधात व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागते अशा ह्या शिक्षकद्रोही सरकारचा फक्त निषेध करून चालणार नाही तर सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी स्वतःचं अस्तित्व टिकविण्याठी एकजूटीने सरकारच्या ह्या जुलमी मसुद्याला टोकाचा विरोध केलाच पाहिजे.
    जे शिक्षक भारतीचे शिक्षक आमदार मा.कपिल पाटील साहेब आणि त्यांचे धुरंधर पदाधिकारी सतत शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने लढा देत आहेत त्यांची साथ देऊन त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत व या शिक्षकद्रोही सरकारला धडा

    ReplyDelete
  14. संघर्ष अटल आहे

    ReplyDelete
  15. निषेध निषेध. ...

    ReplyDelete
  16. सर्वच मिळुन लढा देऊ.

    ReplyDelete
  17. Sarv shikshakshikshaketar bandhavani ekatra Yeun lash Deen avashyak ahe vel gelyavar Upton nahi Atari sarvani ekatra Yeun sangharsha samitis pathimbadyave amhi ladyasathi Tayar ahot.

    ReplyDelete
  18. ये तो सरासर अन्याय है

    ReplyDelete
  19. हो आपल्या ला लढावं च लागेल

    ReplyDelete
  20. सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करा बाकीचे काय शासनाचे जावई नाहीत

    ReplyDelete
  21. सर्वच मिळुन लढु या

    ReplyDelete
  22. *इतिहास कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा.*

    डिसेंबर १९७७ पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा *११ टक्के महागाई भत्ता* जास्त मिळत होता.बाजारात सर्वांना सारख्या महागाईला तोंड द्यावे लागत असेल तर वेतनातही सर्वांना समान महागाई भत्ता मिळावा. अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका होती. दि. १७ मे १९७७ पासून वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरकारी , निमसरकारी, शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा राज्यातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांनी श्री. र. ग. कर्णिक ( राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस ) यांच्या नेतृत्वाखाली राज्याची एक समन्वय समिती स्थापन केली व ११ टक्क्याच्या महागाई भत्त्याची तफावत दूर करून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून *दिनांक ७ डिसेंबर १९७७* रोजी राज्य सरकारी , निम सरकारी व शिक्षकांच्या समन्वय समितीने एक दिवसाचा *लाक्षणिक संप* केला. संध्याकाळी सातच्या रेडीओ वरील प्रादेशिक बातम्यामध्ये काय निर्णय होतोय, ते ऐकण्यासासाठी सर्व कर्मचारी उत्सुक होते. महागाई भत्त्याच्या तफावतीची न्याय्य मागणी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील मान्य करतील असा सर्वांचा समज होता. *मात्र त्यांनी सांगितले, “ दमडीही देणार नाही.”*

    महागाई भत्ता तफावत दूर करण्यासाठी राज्य समन्वय समितीने दि.१४ डिसेंबर १९७७ पासून बेमुदत संप सुरु केला. सरकारी कार्यालये , जिल्हा परिषदा, पंचायत समित्या , माध्यमिक व प्राथमिक शाळा ओस पडल्या. सफाई कामगारही या संपात उतरल्याने मोठमोठ्या शहरात घाणीचे साम्राज्य पसरले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. तरीही मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारला घाम फुटला नाही. *दि.५ फेब्रुवारी १९७८ पर्यंत म्हणजे ५४ दिवस संप चालू राहिला.* अखेर काहीही पदरात न पडता हा संप समन्वय समितीला माघार घेणे भाग पडले. सर्व कर्मचारी वसंतदादा पाटील यांच्या शासनावर प्रचंड नाराज होते.

    संप मागे घेतल्यावर साधारणत: साडे पाच महिन्याने म्हणजे दि. १८ जुलै १९७८ रोजी मान. शरदचंद्रजी पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे कॉंग्रेसचे सरकार पाडून पुरोगामी लोकशाही दलाचे ( पुलोद ) सरकार स्थापन केले आणि स्वत: *श्री. शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री झाले.* वसंतदादा पाटील सत्तेवरून गेल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मुख्यमंत्री होताच ५४ दिवसाच्या संपाचा गांभीर्याने विचार करून शरदचंद्रजी पवार यांनी *केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचा निर्णय जाहीर केला.* एवढेच नाही तर *दर सहा महिन्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलाकी, तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याचे धोरण घेतले.* शरदचंद्रजी पवार यांनी महागाई भत्त्याबाबतची ठोकून ठेवलेली खैराची खुंटी त्यानंतरच्या एकाही सरकारला काढणे शक्य झाले नाही.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला कि महाराष्ट्र सरकार महागाई भत्ता वाढीचा शासकीय आदेश काढीत असे. तिसऱ्या ( भोळे) आयोगापासून विनाविलंब महागाई भत्त्याची वाढ केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत होती.आता मात्र केंद्राने महागाई भत्ता वाढविल्यानंतर सहा महिन्याने महाराष्ट्र सरकार वाढीव महागाई भत्त्याचा शासकीय आदेश काढून राहिलेल्या सहा महिन्याच्या थकबाकीच्या महागाई भत्त्यासाठी काही महिन्यांनी स्वतंत्र आदेश काढते. केंद्र सरकाने दि. २७ फेब्रुवारी२०१९ ला आदेश काढून १ जानेवारी २०१९ पासून १२ टक्क्याने महागाई भत्ता दिला. तर महाराष्ट्र शासनाने दि. ८ जुलै २०१९ रोजी आदेश काढून दि. १ जानेवारी २०१९ पासून १२ टक्के महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी २०१९ ते जून २०१९ अखेरचा सहा महिन्याचा महागाई भत्ता *थकीत ठेवून नंतर देण्याचे आदेशित केले.*

    महागाई भत्त्याची वाढ ही *आखिल भारतीय ग्राहक किमत निर्देशांक* (All India Consumer Price Index Number = AICPIN ) यावर अवलंबून असते. जुलै ते डिसेंबर २०१८ या सहा महिन्याच्या निर्देशांकावर दि. १ जानेवारी २०१९ पासूनची ३ टक्के वाढ ( ९ % ची १२ % ) केंद्राने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी आदेश काढून दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाने दि. ८ जुलै २०१९ रोजी आदेश काढून दिलेली आहे. या आदेशाठी राज्य सरकारला पांच ते सहा महिन्यांचा उशीर होतो.

    *जानेवारी २०१९ ते मे २०१९ अखेरचा ग्राहक किमत निर्देशांक जाहीर झालेला असून मे अखेच्या निर्देशांकावर १६.३८ टक्के म्हणजे पूर्णांकात १६ टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित झालेली आहे.* मे चा ग्राहक निर्देशांक ३१४ असून जूनचा निर्देशांक ३०८ ते ३१४ पर्यंत राहिला तरी १७ टक्के महागाई भत्ता होईल व दि. १ जुलै २०१९ पासून तो लागू होईल.

    ReplyDelete
  23. आता रस्त्यावर उतरून यांना उत्तर द्यावेच लागेल,लागा तयारीला

    ReplyDelete
  24. Sanghrsh attack she.i am with you

    ReplyDelete
  25. निषेध निषेध .....

    ReplyDelete
  26. अन्यायविरोधात लढले पाहिजे. या शासनाला धडा शिकवला पाहिजे.



    ReplyDelete
  27. जाहीर निषेध हा सर्व घाट ए सी मध्ये बसून फतवा काढणाऱ्या गेंड्याच्या कातडीचा लोकांचा आहे काय कळणार त्यांना10 वर्षे विनाअनुदानित म्हणून काम केलेल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना तीव्र लढा उभा करू अन्यायला आता लढा द्यायला आता आम्ही मागे नाही हटणार

    ReplyDelete
  28. फक्त शिक्षकांच्याच मागे का लागले हे सरकार धिक्कार या सरकारचा

    ReplyDelete
  29. पवार साहेबांनी सुरू केले आहे आणि बंद करू पाहत आहे बरोबर नाही. जसे केंद्राला भत्ता मिळतात तसे शिक्षकांनीही मिळाले पाहिजे

    ReplyDelete
  30. निषेध संघर्षासाठी तयार

    ReplyDelete
  31. Kale sarkar .thecha.sarvani thechaychech.

    ReplyDelete
  32. हे सरकार शिक्षक विरोधी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं
    यांना या देशात वेतानामध्ये सुद्धा कअमिक असमानता निर्माण करायची आहे मजाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा शिक्का हे सरकार पुसणार अजून वेळ गेली नाही मित्रांनो विधानसभा पुढे आहे आपल्याला पाच वर्षात जे छळल त्याचे उट्टे काढा आणि हे षडयंत्र हणून पाढा

    ReplyDelete
  33. Kale sarkar .thecha.sarvani thechaychech.

    ReplyDelete
  34. Kale sarkar .thecha.sarvani thechaychech.

    ReplyDelete
  35. या सरकाराला शिक्षण व शिक्षकाची किंमतच कळत नाही त्याना त्याची जागा दाखवून देउ

    ReplyDelete
  36. हे जर खरे असेल तर या विरोधात आंदोलन उभे केले पाहिजे, शिक्षक भारती मागे सर्व शिक्षक आहेत....

    ReplyDelete
  37. लढा देऊयात

    ReplyDelete
  38. प्रत्यक्ष मैदानात उतरू सर्व तरच विजय मिळवला जाईल

    ReplyDelete
  39. Atta sarvani aktra yevun pratiuttar kele pahije

    ReplyDelete
  40. सरकारने असा वेतनावर मर्यादायेणारा कायदा करू नये

    ReplyDelete
  41. याचा विरोध झाला च पाहिजे

    ReplyDelete
  42. या सरकारचा धिक्कार असो.

    ReplyDelete
  43. लोकशाहीचे सेवक मालक होवु पाहत आहेत

    ReplyDelete
  44. एकत्रित लढा देण्याची गरज आहे

    ReplyDelete
  45. एकञित लढा दिला पाहिजे

    ReplyDelete
  46. शिक्षक हा समाजातील सर्वात महत्वपूर्ण भाग असून त्याच्याच नशिबी हे का???

    लढा दिलाच पाहिजे

    ReplyDelete
  47. This government is destroing the education system by unbelieving on the teacher.they do not think that teacher is builder of this nation.If the government will take this decision we should ready for bycot. This is shame less.

    ReplyDelete
  48. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे विचारायची वेळ आलीआहे. संघर्ष करायला तयार व्हायला पाहिजे

    ReplyDelete
  49. संघर्ष करायला तयार व्हावेच लागेल.या सरकारचा धिक्कार आहे.विधानसभे पुर्वी लढा द्या सर आम्ही सोबत आहोत.

    ReplyDelete
  50. या सरकारला निवडणुकीत जागा दाखवून देवू

    ReplyDelete
  51. लढा देवुया सर सोबती ला आहे

    ReplyDelete
  52. Nyayasathi ladhlech pahije

    ReplyDelete
  53. Nyayasathi ladhlech pahije

    ReplyDelete
  54. हा अन्याय फक्त शिक्षकांवरच का ? शासनाला सर्व कर्मचारी
    सारखेच पाहीजेत लढा दिलाच पाहीजे चला सर्व जण सोबत

    ReplyDelete
  55. आपण सर्वांनी जर ठरवले तर अब की बार गिरे गी सरकार. लढा अपरिहार्य आहे.

    ReplyDelete
  56. या सरकारचा निषेध करत आहे

    ReplyDelete